मोदी सरकारच्या ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ योजनेचे सत्य! किती व्याज मिळते. योजनेचा उद्देश काय, सर्व काही जाणून घ्या

Government scheme :- नमस्कार मित्रांनो महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत पाच लाख खाती उघडण्यात आली. योजनेंतर्गत, कोणतेही पालक किंवा महिला स्वत:साठी किंवा अल्पवयीन मुलीसाठी गुंतवणूक सुरू करू शकतात.

२०२३ मध्ये मोदी सरकारने महिलांसाठी ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ नावाची योजना सुरू केली होती. महिलांना बचत करण्यासाठी प्रवृत्त करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. कोणतीही महिला या योजनेत गुंतवणूक करू शकते.

अवघ्या दोन महिन्यांत हा विक्रम झाला

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांच्या कालावधीत पाच लाख खाती उघडण्यात आली.

तुम्ही किती गुंतवणूक करू शकता?

ही कमी वेळेची बचत करणारी योजना आहे. ज्यामध्ये किमान एक हजार रुपये आणि कमाल 2,00,000 रुपये गुंतवणूक करता येते. या योजनेत महिला कितीही खाती उघडू शकतात.

परंतु सर्व ( accounts ) खात्यांमध्ये जमा केलेली एकूण रक्कम 2 लाख रुपयांहुन अधिक नसावी. यासोबतच पहिले खाते आणि दुसरे खाते उघडण्यात किमान तीन महिन्यांचे अंतर असावे.

तुम्हाला किती व्याज मिळते?

महिलांना त्यांच्या गुंतवणुकीवर 7.50 टक्के चक्रवाढ व्याज मिळते.

वय मर्यादा काय आहे

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत कोणतीही महिला खाते उघडू शकते. जर मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर ती तिच्या पालकांच्या देखरेखीखाली खाते उघडू शकते.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत खाते कसे उघडावे

एखादी महिला अधिकृत बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरून हे खाते उघडू शकते. यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट साईझ फोटो

तुम्ही तुमच्या खात्यातून कधी पैसे काढू शकता?

या योजनेमध्ये मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधासुद्धा देण्यात आली आहे. एक वर्षाच्या कालावधीनंतर, खातेदार त्याच्या खात्यातून एकूण ठेवीपैकी 40 टक्के रक्कम काढू शकतो. जर खातेदाराचा मृत्यू झाला, तर अशा परिस्थितीत नॉमिनीला संपूर्ण जमा केलेले भांडवल काढण्याचा अधिकार असेल.

Leave a Comment

error: Content is protected !!